Chauri Chaura Express Railways Station : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्क्दायक घटना घडली आहे. चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कानपूर सेंट्रल स्टेशनवरून निघाल्यानंतर थोड्याच वेळात चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. अनवरगंजहून गोरखपूरला जाणारी ट्रेन क्रमांक 15003 देखील रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रेल्वे अधिकारी सध्या घटनास्थळी असून ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून निघाली होती. थोड्याच अंतरावर ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरले. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अचानक चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.