प्रसाद रानडे,पनवेल:कोकणातून मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसासाठी पनवेल हे केवळ एक स्टेशन नाही तर गावाकडे जाण्याचा व गावाकडून मुंबईला जाण्याचा एक मोठा एंट्री पॉईंट आहे. हार्बर मार्गे आपल्या गंतव्य ठिकाणी जायचं असेल, तर पनवेलशिवाय पर्याय नाही. पण आज याच पनवेल स्टेशनची अवस्था फारशी चांगली नाही. सामान घेऊन जिने चढणं असो, प्लॅटफॉर्म शोधणं असो की ३०० मीटर दूर जाऊन तिकीट काढणं असो — स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी पनवेलवर उतरावं की चढावं, हाच मोठा प्रश्न बनलाय. कोकणच्या छोट्या-छोट्या स्टेशनवर स्टॉप आणि शेडची मागणी करणारे लोकप्रतिनिधी, मध्य रेल्वे मार्गावर असणाऱ्या पनवेल स्थानकाकडे लक्ष देतील का असा संतप्त सवाल आता व्यक्त होत आहे.




प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागतो येथे रेल्वे स्थानकांवर जसा ईस्ट आणि वेस्ट बाकी ठिकाणी असतं त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला या सुविधा पनवेल येथे नाहीत. सध्याची स्टेशनकडची बाजूची पनवेल बस स्टॅन्ड कडून येते मात्र स्टेशनची दुसरी बाजू आहे तिथे कोणत्याही सुविधा नाहीत बस नाही, रिक्षा नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठी पायपीट करून बराच त्रास सहन करावा लागतो.




पर्यटकांची धावपळमग पुढे चालू होतो तो प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीन लोकलसाठी आणि पाच सहा सात कोकणसाठी या प्लॅटफॉर्म क्रमांकाचा घोळ. कुठेही व्यवस्थित इंडिकेटर नाही बोर्ड नाही.सध्या प्लॅटफॉर्म नंबर चार ते तीन दोन एक ला जायला सुविधा असली तरी योग्य प्रकारे कोणतेही बोर्ड अथवा योग्य इंडिकेटर नाहीत.तेच हाच सबवे पाच सहा सात जेथून कोकणातल्या गाड्या जातात तिथे जोडणे आवश्यक आहे मात्र तोही जोडला नसल्याने प्रवासी पर्यटकांना मोठी धावपळ करावी लागते.




कोणतीही सुविधा नाहीरेल्वे स्थानकावर ती पाच सहा सात या क्रमांकावर ज्या ठिकाणी कोकणात येणाऱ्या गाड्या येतात तिथून जवळच रिक्षा अथवा लोकल बसची कोणतीही सुविधा नाही त्यासाठी मोठी धावपळ करत प्रवासी पर्यटकांना बॅगा संभाळत जावं लागतं.




हार्बर लोकलपनवेल कडून जी एन्ट्री साईड आहे बस स्टँड कडुन साईडची तिथेच सर्व तिकिटे मिळतात दोन्ही लोकल आणि बाहेरची सुद्धा पण मात्र कोकणी माणूस कोकण रेल्वेतून पाच ,सहा, सात या प्लॅटफॉर्ममवर प्रवासी उतरतात. आणि याचवेळी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीन जे हार्बर लोकलसाठी पकडायला जाण्यासाठी एक सबवे केला आहे त्या सब-वे मध्ये तिकीट काढण्यासाठी व्यवस्था किंवा अजून एखादा मशीन बसवलं तर पुन्हा लोकलचे तिकीट घ्यायला स्टेशन बाहेर जायला लागणार नाही हा मोठा त्रास वाचेल.




असुविधांकडे लक्ष नाही.कोकण रेल्वे मार्गावरचं पनवेल हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे मात्र या ठिकाणी असलेल्या असुविधा यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कोकण व मुंबई जोडणारे पनवेल हे अत्यंत महत्त्वाचं मध्य रेल्वे मार्गावरचं स्थानक आहे. कोकण रेल्वेतून उतरल्यानंतर पुढे मुंबईला जाण्यासाठी लोकल ट्रेनचे प्रवासी तिकीट काढण्यासाठी असलेला तिकीट काउंटर हा सुद्धा बाहेर तीनशे मीटर दूरवर आहे त्यामुळे तिकीट काढण्यासाठीचा प्लॅटफॉर्म हा शोधण्याची वेळ प्रवासी पर्यटकांवर येते. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर प्रवासी पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. चढण्या उतरण्यासाठी असलेले जीने मार्ग हे सुद्धा अडचणीचे आहेत. कोणताही सुटसुटीतपणा या रेल्वे स्थानकात नाही मात्र याकडे कोकणातील लोकप्रतिनिधी आमदार व खासदार या रेल्वे स्थानकातील असुविधांकडे लक्ष देत नसल्यानेच अशी येथील प्रवासी पर्यटकांची खंत आहे.







प्रवासी पर्यटकांची मागणीकोकणातून जाण्यासाठी पनवेल हा मोठा इंट्री पॉईंट आहे. त्यामुळे या स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन हे स्थानक सुविधायुक्त व प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जाताना येताना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी ही प्रक्रिया या स्थानकात सोप्पीसुलभ करावी अशी मागणी प्रवासी पर्यटकांकडून होत आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.