बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






महाराष्ट्रातील प्रमुख सण-उत्सवांच्या निमित्ताने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर मराठी गाणी, पोवाडे आणि सांस्पृतिक संगीत वाजवण्यासाठी कायमस्वरूपी परिपत्रक काढा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सध्या प्रवाशांच्या घोषणा डावलून कर्पश आवाजात भोजपुरी गाणी वाजवली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करू नका, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्पृतिक परंपरेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर मराठी गाणी, महाराष्ट्र गीत, प्रेरणादायी पोवाडे आणि पारंपरिक सांस्पृतिक संगीत वाजवण्याबाबत सर्व स्थानकप्रमुखांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषा गौरव दिन, गुढीपाडवा–मराठी नववर्ष, महाराष्ट्र दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव व गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव व विजयादशमी, दिवाळी, बळीराजाचा अभिमान असलेला बैलपोळा, आषाढी एकादशी, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे पारंपरिक व सांस्पृतिक सणांच्या वेळी या घोषणा कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना नगरसेविका माधुरी मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांना निवेदन दिले. यावेळी शाखाप्रमुख संदीप कांबळे, महिला शाखा संघटक विशाखा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.