Rudransh Thakur Viral Video : एखाद्याची हटके स्टाईल, आत्मविश्वासपूर्ण वावर किंवा निरागस अंदाजही करोडो लोकांचे लक्ष वेधून घेतो, याचाच प्रत्यय सध्या यवतमाळच्या वाघापूर परिसरात राहणाऱ्या रुद्रांश मंगेश सिसोदिया ठाकूर या 23 महिन्याच्या चिमुकल्याच्या रूपाने समोर आला आहे. रुद्रांशची हटके स्टाईल अन् भारी स्वॅग नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. परिणामी रुद्रांशचा व्हिडिओ (Rudransh Thakur Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) सध्या चांगलाच वायरल झाला असून साऱ्यांच्या कौतुकाचा तो विषय बनला आहे. अवघ्या आठ दिवसात वायरल केलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर अकरा कोटी लोकांनी बघितले आहे. तर 90 लाख चहात्यांनी पसंती दिलीय. रुद्राच्या हटके लुकला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या रुबाबदार अंदाजामुळे काहींनी त्याला छोटा डॉन तर काहींनी त्याला होंडा कंपनीचा नवीन चेअरमन, अशी उपाधी दिली आहे. ( Yavatmal Rudransh Thakur Viral Video)
View this post on Instagram
सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके स्टाईलने 23 महिन्याचा 'रुद्रांश' बनला सोशल मीडियावर स्टार (Yavatmal Rudransh Thakur Viral Video)
यवतमाळ येथील वाघापूर परिसरात रुद्रांश ठाकूर या 23 महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. वडील मंगेश सिसोदिया ठाकूर हे वायफाय या खाजगी कंपनीत काम करतात तर आई खाजगी कंपनीमध्ये जॉब करते. ठाकूर कुटुंबीय दिवाळीनिमित्त दुचाकी खरेदी करण्यासाठी यवतमाळ येथील होंडा शोरूम इथे गेले होते. शोरूममध्ये सजवलेल्या नव्या स्कूटर समोर रुद्रांशने दिलेल्या पोझने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्यावर गॉगल, अंगावर आकर्षक कपडे, खांद्यावर सस्पेंडर आणि दोन्ही हात खिशात घालून उभा असलेल्या रुद्रांशला पाहून उपस्थितांनीही त्याचे कौतुक केले. एवढ्या कमी वयात त्याचा आत्मविश्वास आणि कॅमेरासमोरचा सहज वावर पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. रुद्राक्ष ठाकूर या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसराची एक नवीन ओळख झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याने आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रुद्राक्षची आई निशा ठाकूर यांनी दिलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.