Nagpur Car Accident : नागपूरातील अंबाझरी तलावाच्या (Ambazari Lake)ओवरफ्लो पॉईंटजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एकाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातील (Car Accident) कार इतकी भरधाव होती की ती थेट अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट जवळच्या पुलाचे कठळे तोडून अंबाझरी नाल्यात कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी ते सुभाषनगर मार्गावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात (Nagpur Car Accident) झालाय. अंबाझरी ओव्हरफ्लो स्पॉटजवळ पुलाचे कठडे तोडून एक कार नाल्यात कोसळली. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरु केली असून सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचे कठडे तोडले आणि थेट नाल्यात कोसळली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अंबाझरी पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तपासाअंती अपघातामागचं नेमकं कारण कळू शकणार आहे.
Bhandara Crime News : भंडारा शहरात घरफोडी, दुकान फोडीच्या घटना थांबता थांबेना, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
भंडारा शहरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. चोरांनी ज्वेलर्स दुकान, किराणा दुकान आणि घरफोडी करून भंडारा पोलिसांनाचं मोठं आवाहन दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी भंडारा पोलिसांनी खात रोड मार्गावर नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी मोठ्या थाटात सुरू केली. त्या पोलिस चौकी परिसरात चोरांनी डल्ला मारला आहे. किराणा दुकानाचं शटर तोडून चोरी केल्याची घटना पहाटे समोर आली आहे. देव्हारे किराणा दुकानात ही चोरी झाली असून, हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आत प्रवेश करून दुकानातील साहित्याची उलथापालथ केली आणि ऐवज लंपास केला. मात्र, नेमका किती ऐवज आणि रोकड चोरीला गेली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती व पोलिसांप्रती नाराजी पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.