IPO Market : जागतिक आयपीओ बाजारात पुन्हा एकदा जुमानले व्यवहार होताना दिसत आहेत. जगभरात AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने लोकप्रिय होत असून जागतिक पातळीवरील दिग्गज एआय कंपन्यांपैकी अँथ्रोपिक आता शेअर बाजारात उडी घेण्याच्या तयारीत आहे. अँथ्रोपिक जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO लाँच करणार आहे, जो काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या एलन मस्कच्या स्पेसएक्सच्या 75 अब्ज डॉलर्सपेक्षाही मोठा असणार आहे.




या वर्षी एआय क्षेत्राशी संबंधित अँथ्रोपिकचा इश्यू दुसरा मोठा आयपीओ असेल. याआधी जूनमध्ये स्पेसएक्सने रेकॉर्ड आयपीओ इश्यू लाँच केला होता. जगभरातील गुंतवणूकदार करण्याच्या संधी शोधत असताना अँथ्रोपिक इश्यू जागतिक गुंतवणूकदारांना आणखी एक संधी मिळवून देईल. पण एआय मॉडेल्स विकसित करणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि चालवणे यासाठी येणाऱ्या प्रचंड खर्चाबद्दल गुंतवणूकदारांची चिंताही वाढत आहे.




अँथ्रोपिकचा ऐतिहासिक आयपीओकंपनीने IPO साठी 70 ते 78 डॉलर असा प्राईस बँड निश्चित केला आहे, पण गुंतवणूकदारांच्या प्रचंड मागणीच्या पार्श्वभूमीवर 83 डॉलर दराने स्टॉक वाटप करण्याचा निर्धार जाहीर केला. म्हणजे शेअर्सची किंमत कमाल किंमत मर्यादेपेक्षा जास्त असेल. गुंतवणूकदारांकडून आयपीओला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि देऊ शेअर्सच्या संख्येपेक्षा मागणी अनेक पटींनी जास्त होती. कंपनीच्या शेअर्सचा व्यापार गुरुवारी अमेरिकेच्या Nasdaq स्टॉक एक्सचेंजवर ANT या टिकर नावाने सुरू होईल. एआय सेक्टरमधील अँथ्रोपिकचा इश्यू आतापर्यंतचा मानला जात आहे.




AI विश्वात वेगाने लोकप्रिय होणारी कंपनी, अँथ्रोपिक, आता शेअर बाजारात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. क्लाउड एआय चॅटबॉट बनवणाऱ्या या कंपनीचा आयपीओ जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक इश्यूंपैकी ठरणार आहे. WSJ मधील एका अहवालानुसार, बाजारात सूचीबद्ध होताना कंपनीचे मूल्यांकन 1.33 ट्रिलियन डॉलर्स किंवा त्याहून अधिक पोहचू शकते.




सध्या कंपनीचे मूल्यांकन सुमारे 965 अब्ज डॉलर्स असून पिचबुकनुसार, 300 हून अधिक गुंतवणूकदारांनी अँथ्रोपिकमध्ये गुंतवणूक केली आहे ज्यामध्ये मोठ्या गुंतवणूक कंपन्या, प्रायव्हेट इक्विटी फंड, श्रीमंत व्यावसायिक, मोठ्या कंपन्या आणि सरकारी गुंतवणूक निधी यांचा समावेश आहे.




महसूल वाढला, पण खर्च अन् तोट्याचे आव्हान




30 सप्टेंबर रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत, अँथ्रोपिकचा महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास 1200% वाढून $33.24 अब्ज झाला. तसेच या कालावधीत कंपनीने $104 अब्जचा निव्वळ तोटा देखील नोंदवला, पण यापैकी बहुतेक तोटा कन्वर्टेबल नोट्स आणि डेरिव्हेटिव्ह दायित्वांच्या वाजवी मूल्यातील बदलांमुळे होता. 2025 मध्ये संपणाऱ्या याच नऊ महिन्यांत, अँथ्रोपिकला $25.1 अब्जचा तोटा झाला होता.




दुसरीकडे, आता एआय मॉडेल्स विकसित करण्याचा आणि चालवण्याचा प्रचंड खर्चाचे कंपनीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.यासाठी मोठे डेटा सेंटर्स, महागड्या एआय चिप्स आणि संगणकीय शक्तीची गरज असेल. अशा स्थितीत, कंपनीने म्हटले आहे की येत्या काही वर्षांत संगणकीय आणि पायाभूत सुविधांवर अंदाजे $900 अब्ज खर्च करेल.




अँथ्रोपिक IPO मध्ये भारतीय गुंतवणूकदार कशी गुंतवणूक करू शकतात?




INDmoney ॲपद्वारे भारतीय गुंतवणूकदार काही स्टेप्स फॉलो करून अँथ्रोपिकचे शेअर्स प्री-ऑर्डर करू शकतात.





  • सर्वप्रथम ॲपवर यूएस स्टॉक्स खाते उघडा आणि आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

  • यूएस शेअर्स खरेदीसाठी खात्यात पुरेशी डॉलर शिल्लक ठेवा. आरबीआयच्या (RBI) LRS नियमांनुसार, भारतीय रहिवासी एका आर्थिक वर्षात परदेशात $250,000 पर्यंत गुंतवणूक करू शकतात.

  • त्यानंतर, स्टॉक ब्रोकरेज ॲपमध्ये अँथ्रोपिक किंवा ANT टाइप करा आणि कंपनीचे स्टॉक पेज उघडा.

  • शेअर्स खरेदीसाठी बाय पर्याय निवडा. प्री-ऑर्डरमध्ये फक्त पूर्ण शेअर्स खरेदी करता येतात, अर्धे शेअर्स नाही.

  • त्यानंतर, लिमिट प्राईस निवडा. म्हणजे, ज्या कमाल किमतीला तुम्हाला शेअर खरेदी करायचे आहेत, ॲपमध्ये दर्शविलेल्या निर्दिष्ट मर्यादेत ती किंमत नमूद करा.

  • शेअर्सची संख्या, किंमत आणि इतर शुल्क तपासा आणि ऑर्डर सबमिट करा.

  • लिस्टिंगनंतर तुम्ही कोट केलेल्या किमतीवर शेअर्स उपलब्ध असतील तरच तुमची ऑर्डर मान्य केली जाईल पण, ऑर्डरची अंमलबजावणी होईलच याची हमी नाही.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.