बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR व्याजदरात वाढ केली आहे. 5 पैकी 4 मुदतीच्या प्रकारांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. वर्षभराची मुदत असणाऱ्या कर्ज पद्धतीला या व्याज दरवाढीतून दूर ठेवण्यात आले आहे. तर ओव्हरनाईट, 1 महिना, 3 महीने तसेच 6 महिन्यांची मुदत असणाऱ्या कर्ज प्रकारांसाठी नवे व्याजदर लागू केले आहेत. या बँकेतील MCLR शी जोडलेल्या कर्जावर या दरवाढीचा परिणाम होणार आहे. MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स. MCLR दर बँकेचा किमान व्याजदर असतो. त्यापेक्षा कमी दराने बँक कर्ज देत नाही. सदर व्याज दरवाढ MCLR दराशी लिंक्ड असणाऱ्या कर्जासंबंधित आहे. फिक्स्ड रेट असणाऱ्या किंवा इतर फ्लोटिंग रेट प्रकाराशी जोडलेल्या कर्ज प्रकारावर या व्याज दरवाढीचा काहीच परिणाम होणार नाही.




बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे MCLR व्याजदर काय? मुदतीचे कर्ज सोडून इतर सगळ्याच मुदतीच्या MCLR व्याजदरात वाढ केली आहे. आधी ओव्हरनाईट मुदतीच्या कर्जाचे MCLR दर 6.95% होते. यात 80 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून नवे दर 7.75% आहेत. एका महिन्यांच्या मुदतीचे कर्ज 50 बेसिस पॉईंट्सने वाढवून दर 7.80% वरून 8.30% करण्यात आले आहेत. 3 महिन्यांच्या कर्जात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवे MCLR दर 8.60% आहेत. तर 6 महिन्यांच्या कर्जात MCLR दर 20 बेसिस पॉईंट्सने वाढवून दर थेट 8.85% वर पोहचले आहेत. एका वर्षाच्या कर्ज प्रकारात MCLR दर आधीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले असून ते 9.05% आहे.




ऑक्टोबर 2019 नंतर सगळे चित्रच बदलले देशातील कर्ज बाजारात व्याज दरांचे संपूर्ण चित्रच बदलले आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत घेण्यात आलेला प्रत्येक घर कर्ज किंवा कार लोन हा RLLR किंवा EBLR या प्रकारात मोडतो. त्यामुळे MCLR दर वाढीचा या प्रकारच्या कर्जांवर काहीच परिणाम होत नाही. पण एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या कालावधीत घेण्यात आलेले सामान्य कर्जही MCLR शी जोडलेले आहेत. त्यामुळे या कालावधीत घेतलेल्या कर्जाचा EMI अद्याप सुरू असेल तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या या दर वाढीचा नक्कीच परिणाम होईल. एक तर EMI ची दरमाह रक्कम वाढेल किंवा EMI चा कालावधी वाढवण्यात येईल. आजच्या घडीला बँकेने MCLR लिंक्ड कर्ज पूर्णपणे बंद केले नसून आजही मोठमोठ्या व्यावसायिकांना तसेच कंपन्यांना MCLR शी जोडलेले कर्ज देण्यात येते. त

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.