बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित व्हिक्टर बॅडमिंटन आशिया सिनिअर चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरीच्या  सरोज सावंत यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दैदीप्यमान यश संपादन केले आहे. महिला दुहेरीत  मंजुषा सहस्रबुद्धे यांच्या साथीने सुवर्णपदकाची कमाई करत त्यांनी हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, तर महिला एकेरीत कांस्यपदक पटकावून आपल्या अष्टपैलू खेळाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.



आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण स्पर्धेत विविध देशांतील अनुभवी आणि मातब्बर खेळाडूंचा सहभाग होता. अशा स्पर्धेत भारतीय जोडीने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे, उत्कृष्ट समन्वयाचे आणि जिद्दीचे दर्शन घडवत सुवर्णपदकावर नाव कोरले. महिला दुहेरीतील विजय हा त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचा, मेहनतीचा आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचा गौरवपूर्ण परिणाम आहे.


महिला एकेरीतही सरोज सावंत यांनी प्रत्येक सामन्यात आत्मविश्वासाने आणि जिद्दीने खेळ करत कांस्यपदक मिळवले. दुहेरीतील सुवर्ण आणि एकेरीतील कांस्य अशा दोन पदकांची कमाई करत त्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश नोंदवले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन स्मॅशर्स ग्रुप तसेच ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू प्रसन्न आंबुलकर  यांनी  सरोज सावंत यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.








Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.