बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आजच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य विक्रांत जाधव यांनी जिल्ह्यात बांधलेल्या सात हजार बंधाऱ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मागणी केली. ती मागणी समितीने मान्य केली असून आरोग्य विभाग सर्व बंधाऱ्यांमध्ये गप्पी मासे सोडणार आहे.


दुष्काळाला सामोरे जाताना रत्नागिरी जिल्ह्यात पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमे अंतर्गत सात हजार बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधाऱ्यात साचलेल्या पाण्यातून डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव होऊ शकतो या भीतीमुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सर्व बंधाऱ्यात गप्पी मासे सोडणार आहे.


रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची बैठक आज पार पडली. या बैठकीत रत्नागिरी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद एकत्र फवारणी मोहीम राबवणार आहे. तसेच १०८ च्या आणखीन १७ रूग्णवाहिकांची मागणी करण्यात आली असून नादुरुस्त रूग्णवाहिका बदलून नव्या रूग्णवाहिका मागविण्यात आल्या आहेत. तसेच एचपीव्ही लसच्या उपलब्ध साठ्याची एक्सापायरी डेट ऑक्टोबर २०२७ आहे त्यापूर्वी हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.