मुंबई : न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. न्यूझीलंडने निर्णायक क्षणी चिवट बॅटिंग करत भारताला विजयी होण्यापासून यशस्वीरित्या रोखण्यात यश मिळवलं. तसंच कर्णधार शुभमन गिल याने १५ ओव्हरआधीच सामना अनिर्णित ठेवण्यासाठी सहमती दर्शवली. त्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हस्तांदोलन केलं. अशाप्रकारे सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे २ सामन्यांची मालिका पहिल्या टेस्टनंतर ०-० ने बरोबरीत आहे. पहिल्या कसोटीनंतर कर्णधार शुभमन गिल याने बॉलवर थुंकी न लावण्याच्या निर्णयावरुन जाहीर नाराजी व्यक्त केली. कोव्हीड संपून अनेक वर्ष झाली. मात्र त्यानंतरही हा नियम अजून का? असा प्रश्न शुभमनने उपस्थित केला होता. यावरुन आता आयसीसीने उत्तर दिलंय. आयसीसीने शुभमनची बॉलला थुंकी लावण्याची मागणी फेटाळून लावली आहे. पीटीआयने याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसीने बॉलवर थुंकी लावण्याबाबतची बंदी हटवण्याच्या याच्या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. आयसीसीची या निर्णयाबाबत कोणताही बदल करण्याची योजना नाही. गिलने वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ही मागणी केली होती. कुकाबूरा बॉल लवकर मऊ पडत होता. तसंच खेळाडूंना बॉलची चमक वाढवण्यासाठी थुंकीचा वापर करण्याची परवानगी द्यायाला हवी जेणेकरुन गोलंदाजांना मदत मिळेल, अशी मागणी शुभमनने केली होती. मात्र आयसीसीने शुभमनच्या या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. आयसीसीने कोरोना काळात खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करता बॉलवर थुंकी लावण्यावर बंदी घातली होती.

खेळाडूंकडून सामन्यादरम्यान गोलंदाजांना जास्त मदत मिळावी, या हेतुने बॉलवर थुंकी लावण्यात येते. बॉल मांडीवर घासून त्याला झळाली देण्याचा प्रयत्न केला जातो. खेळाडू अनेक प्रकारे बॉल चमकावा यासाठी प्रयत्न करत असतात. थुंकी लावल्याने तुलनेत बॉल अधिक चमकतो. त्यामुळे शुभमन ही मागणी केली होती. मात्र आयसीसीने नकार दिल्याने शुभमनसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.

शुभमन काय म्हणाला होता?''आपण कोरोना काळाच्या खूप पुढे आलो आहोत. बॉलला झळाळी देण्यासाठी थुंकीचा वापर करता येणार नाही, असा तेव्हा नियम करण्यात आला होता. मात्र आता कोरोना जाऊन ७-८ वर्ष झाली आहेत. त्यामुळे आयसीसी पुन्हा एकदा बॉलवर थुंकी लावण्यासाठी परवानगी का देत नाही? हे मला समजत नाही'', असा प्रश्न शुभमनने उपस्थि केला होता.

शुभमनची जाहीर मागणी, आयसीसीचा स्पष्ट नकार

STORY | ICC has no plans to review saliva ban despite calls from Shubman GillThe International Cricket Council doesn't plan to review its ban on applying saliva to the ball due to health and cricketing reasons despite calls from Indian captain Shubman Gill.Following the drawn first Test on a benign pitch at the Basin Reserve in Wellington, Gill complained that the Kookaburra ball was getting soft too early and said.(Story by Bharat Sharma/PTI)READ: https://t.co/JdKp1CIePa

— Press Trust of India (@PTI_News) ]]>

दुसरा सामना केव्हा?दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना हा शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांकडे या सामन्यात सामन्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. त्यामुळे यजमान विजयी होणार की टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकत दौऱ्याचा जबरदस्त शेवट करण्यात यशस्वी होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.