म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नगरसोल ते तारूर दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २५ नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

खालील पॅसेंजर रेल्वे रद्द

  • रेल्वे क्रमांक ७७६१९ जालना–नगरसोल पॅसेंजर ही रेल्वे १, ३, ७, ८ व १० डिसेंबर रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
  • रेल्वे क्रमांक ७७६२० नगरसोल –जालना पॅसेंजर ही रेल्वे १, ३, ७, ८ व १० डिसेंबरला रद्द.
  • रेल्वे क्रमांक ७७६२१ जालना–नगरसोल डेमू रेल्वेच्या २, ४, ५, ६ व ९ डिसेंबरच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • रेल्वे क्रमांक ७७६२२ नगरसोल–जालना डेमू – २, ४, ५, ६ व ९ डिसेंबरच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (एकूण ५ फेऱ्या

काही गाड्या अंशतः रद्द

  • खालील गाड्यांच्या फेऱ्या नगरसोल –रोटेगाव किंवा रोटेगाव– नगरसोल दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत
  • रेल्वे क्रमांक १६००३ चेन्नई–नगरसोल एक्स्प्रेस – ६ डिसेंबर रोजी रोटेगाव–नगरसोल दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. (एकूण १ फेरी)
  • रेल्वे क्रमांक १६००४ नगरसोल–चेन्नई एक्स्प्रेस ही रेल्वे ७ डिसेंबर रोजी नगरसोल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक १७२३१ नरसापूर –नगरसोल एक्स्प्रेस ही रेल्वे ४ व ६ डिसेंबर २०२६ रोजी रोटेगाव–नगरसोल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.
  • रेल्वे क्रमांक १७२३२ नगरसोल–नरसापूर एक्स्प्रेस ही रेल्वे ५ व ७ डिसेंबर २०२६ रोजी नगरसोल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.
  • रेल्वे क्रमांक १२७८७ नरसापूर–नगरसोल एक्स्प्रेस ही रेल्वे ३०.११.२६, ०१.१२.२६, ०२.१२.२६, ०३.१२.२६, ०५.१२.२५, ०७.१२.२६, ०८.१२.२६, ०९.१२.२६ रोजीच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसोल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण ८ फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक १२७८८ नगरसोल–नरसापूर एक्स्प्रेस ही रेल्वे ०१,०२, ०३, ०४. तसेच ०६, ०८.०९ आणि १० डिसेंबर रोजीच्या फेऱ्या नगरसोल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे. (एकूण ८ फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक १७६८७ ही रेल्वे १ ते १० डिसेंबर रोजीच्या फेऱ्या मनमाड –लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. (एकूण १० फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक १७६८८ धर्माबाद–मनमाड एक्स्प्रेस ही रेल्वे १ ते १० डिसेंबर २०२६ रोजीच्या फेऱ्या लासूर – मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण १० फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक ५७६५२ मनमाड–नांदेड पॅसेंजर ही रेल्वे ९ व १० डिसेंबर २०२६ रोजीच्या फेऱ्या मनमाड –लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण २ फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक ५७६५१ नांदेड–मनमाड पॅसेंजर ही रेल्वे ८ व ९ डिसेंबर २०२६ रोजीच्या फेऱ्या लासूर – मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.(एकूण २ फेऱ्या)
  • रेल्वे क्रमांक १७६६१ काचीगुडा–नगरसोल एक्स्प्रेस ही रेल्वे ३ ते ९ डिसेंबर २०२६ रोजीच्या फेऱ्या रोटेगाव–नगरसोल दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे.
  • रेल्वे क्रमांक १७६६२ नगरसोल–काचीगुडा एक्स्प्रेस ही रेल्वे ४ ते १० डिसेंबर २०२६ रोजीच्या फेऱ्या नगरसोल–रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द करण्यात येत आहे

काही रेल्वे उशिराने धावतील

  • रेल्वे क्रमांक १२७५३ नांदेड–निझामुद्दीन एक्स्प्रेस ही रेल्वे १ व ८ डिसेंबर रोजी ८० मिनिटांनी उशिराने धावणार आहे.
  • रेल्वे क्रमांक १२७१५ नांदेड–अमृतसर एक्स्प्रेस ही रेल्वे १ ते १० डिसेंबर दरम्यान ७० मिनिटांनी उशिराने धावतील.
  • रेल्वे क्रमांक १७६१८ ही रेल्वे १ ते १० डिसेंबर दरम्यान ७० मिनिटांनी उशिराने धावतील.
रेल्वे प्रवाशांना आवाहन
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वे परिचालनाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.