मुंबई : 'सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 'एक-दोन नव्हे तर सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. एकाला इंजेक्शन देऊन मारण्यात येणार होतं. तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालण्यात येणार होता', असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी केलेल्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
संजय राऊत काय म्हणाले? यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. तसेच या तिन्ही आमदारांची नावेही राऊत यांनी जाहीर केली आहेत. 'सुरतहून परत येणाऱ्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. आता आरोग्यमंत्री असलेले प्रकाश आबिटकरही परत येणार होते. त्यांनी सुरुवातीला परत येण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना अडकवून ठेवलं गेलं. नितीश देशमुख यांना हार्ट अटॅक येईल अशा प्रकारचे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि इंजेक्शन देण्यात आले होते. ते कसे मारले जातील हा डाव होता. तर कैलास पाटील यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना मारण्याचा कट होता', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले होते? यांनी 2022 मधील शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडाबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. 'बंडादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणाऱ्या एका आमदाराचा जीव धोक्यात होता आणि आम्ही जर थांबवलं नसतं, तर त्या दिवशी त्याचं राम नाम सत्य झालं असतं', असा मोठा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संजय शिरसाट यांनी केलेल्या धक्कादायक वरक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत.