दोहा : एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेतील आज 'ब' गटातील भारत अ आणि युएई हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात यूएईचा कर्णधार बासिल हमीद याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय अ संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तान अ संघाविरुद्ध खेळलेल्या गेल्या सामन्यातील संघातून आयुष बदोनी, विप्रज निगम आणि प्रिन्स यादव यांना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्या जागी प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे आणि अर्शद खान यांचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

IPL गाजवलेल्या मॅचविनरला संधीपंजाब किंग्जचा स्फोटक सलामीवीर यष्टीरक्षक-फलंदाज आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०२३ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०३ धावांची शतकी खेळी केली होती. २०२५ च्या हंगामात ५४९ धावा आणि २०२६ च्या हंगामात १६८.८७ च्या स्ट्राईक रेटने ५१० धावा कुटत त्याने नवा इतिहास रचला. सलग दोन आयपीएल हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला अनकॅप्ड भारतीय फलंदाज ठरला होता. आतापर्यंत ६५ आयपीएल सामन्यांत १५६ हून अधिक स्ट्राईक रेटने १,८१५ धावा करत त्याने पंजाबचा प्रमुख मॅच-विनर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी संघाला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तान अ संघाविरुद्ध ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघावर विजयाचे दडपण आहे. नेपाळविरुद्ध पहिल्या सामन्यात ३०६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारताचा नेट रन रेट (+२.५८०) सध्या खूप चांगला आहे, त्यामुळे आजचा विजय भारताला थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून देईल.


🚨 Toss 🚨UAE have won the toss and will bat first in India's A final match of the group stage.Updates ▶️ https://t.co/6Vwvc5BnWQ#TeamIndia | #RisingStarsAsiaCup | #INDAvUAE https://t.co/ocsuMpEIuj

— BCCI (@BCCI) ]]>

या सामन्यात भारतीय चाहत्यांचे लक्ष कर्णधार तिलक वर्मा, स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्या कामगिरीवर लागले आहे. गेल्या सामन्यांत वैभवला मोठी खेळी करता आली नव्हती, त्यामुळे आज त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत हर्षित राणा आणि अर्शद खान यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल. दुसरीकडे, यूएईचा संघ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून भारतासमोर कडवे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांची प्लेइंग ११भारत अ (प्लेइंग ११) : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (C), कुमार कुशाग्र (WK), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा आणि अर्शद खान

युएई (प्लेइंग ११) : आर्यांश शर्मा, अंश टंडन, हरप्रीत सिंग भाटिया, मुहम्मद शाहदाद, एम आफताब आलम (WK), बासिल हमीद (C), एथन डीसूझा, उद्दीश सुरी, इब्रार अहमद, सिमरनजीत सिंग, जाहिद अली

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.