CM Devendra Fadnavis Cabinet Meeting : आज, बुधवार २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षणविषयक अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, शालार्थ प्रणाली, विद्यापीठ अधिनियम सुधारणा, खासगी अनुदानित शाळा आणि सुधारित वेतन संरचना यांचा समावेश आहे. नेमक्या कोणत्या सुधारणा आणि बदल केले आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले:
१. वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 'डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत' सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. यामध्ये भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे.
२. शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वित्तीय सुविधाशालेय शिक्षण विभागाअंतर्गत घेतलेल्या निर्णयानुसार, शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांच्या (NBFC) माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून ही वित्तीय सुविधा मिळेल.
३. विद्यापीठ अधिनियमांत सुधारणाउच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत 'कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम, १९९७' आणि 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, १९८९' यांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता मिळाली आहे. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल व लेखे यांच्या संदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी ही सुधारणा करण्यात येणार आहे.
४. खासगी अनुदानित शाळांसाठी नवा कायदाशालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक असा कायदा तयार केला जाणार आहे. त्यासाठी 'महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६' च्या प्रारूपास आणि ते विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
५. ग्रंथपालांना सातवा वेतन आयोगवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयांमधील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
६. 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ सुधारणातसेच, सहावा महत्त्वाचा निर्णय म्हणजे 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५' मधील तरतुदींच्या सुधारणेस मान्यता मिळाली असून, या संदर्भातील सुधारणा विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.