दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नित्या मेनन सध्या चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्री नातेसंबधं, लग्न आणि घटस्फोट या मुद्द्यावर वेगवेगळी मतं मांडली, नित्या मेनन हिनं देखील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि नातेसंबंधांवर अत्यंत परखडपणे आपं मत मांडलं आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असलेल्या नित्यानं स्पष्ट केलं की, ती लग्नाच्या विरोधात नाही, मात्र केवळ लग्न करायचं म्हणून तिला कोणत्याही नात्यात अडकायचं नाहीए.
'मिशन मंगल', 'रायन' आणि 'इडली कढाई' यांसारख्या चित्रपटांतील अभिनेत्रीनं आपल्या जुन्या नात्यांचे अनुभव शेअर केले. नात्यांमध्ये स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य जपता येणं तिच्यासाठी लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचं असल्याचं नं सांगितलं.
नात्यांमध्ये घुसमट झाल्यामुळं बाहेर पडण्याचा निर्णय नात्यांतून बाहेर पडताना भीती होती का, असं विचारलं असता नित्यानं याला भीतीऐवजी एक 'जाणीव' म्हटलं. ती म्हणाली की, जेव्हा नात्यांमध्ये तुमचा आत्मा महत्त्वाचा नसतो, तेव्हा ते खूप कठीण असतं; पण मी नेहमीच अशा नात्यातून बाजूला होणं योग्य मानलं . समोरच्या व्यक्तीचा प्रभाव असा असतो की, जणू काही मी पुढं जाऊच शकत नाही किंवा मला मोकळा श्वासही घेता येत नाही. असं अनेक लोक असतात जे समोरच्याला मोकळेपणानं श्वासही घेऊ देत नाहीत. ही भीती नसून एक जाणीव असते, की आता थांबायला हवं.
'मी लग्नाच्या विरोधात नाही, योग्य जोडीदाराच्या शोधात आहे' आपल्या लग्नाबाबतच्या विधानांचा अनेकदा चुकीचा अर्थ काढला जातो, असंही नित्यानं या मुलाखतीत स्पष्ट केलं. लोकांना वाटतं की तिला लग्नच करायचं नाही, पण तसं नाहीए. नित्या असंही म्हणाली की, अशा नात्यांतून बाहेर पडल्यावर जणू काही मोठं ओझं उतरल्यासारखे किंवा एक नवं जग उघडल्यासारखं वाटतं.
तुम्ही पुन्हा घेऊ शकता, असं जाणवतं. जेव्हा मी लग्न न करण्याबद्दल बोलते, तेव्हा मी लग्नाच्या विरोधात आहे असं लोकांना वाटतं. पण मी कधीही म्हटलं नाही की मला लग्न करायचं नाहीए. मला लग्न करायचं आहे, पण मला नेमकं काय हवं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला फक्त लग्न करायचं नाही, तर एका योग्य नात्याचा शोध घ्यायचा आहे. जर समोरची व्यक्ती मला माझं स्वातंत्र्य देऊ शकत नसेल, तर अशा लग्नाला काहीच अर्थ नाहीए.
जुन्या नात्यांमध्ये स्वतःला कमकुवत समजायची नित्या आपल्या भूतकाळातील अनुभवांबद्दल बोलताना तिनं सांगितलं की, काही नात्यांमध्ये तिला खूप दडपण आणि बंधन जाणवायचं. तिच्या आवडीनिवडी आणि इच्छांना महत्त्व दिलं जात नव्हतं, ज्यामुळं तिला स्वतःला घुसमटल्यासारखं , जखडल्यासारखं आणि कमकुवत वाटायचं. अशा नात्यांतून बाहेर पडल्यानंतर तिला मोठा दिलासा मिळाला आणि ती पुन्हा आपलं आयुष्य मनमोकळेपणानं जगू लागली.
दरम्यान, नित्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नित्या मेनन गेल्या वर्षी अनेक चित्रपटांमध्ये झळकली. यामध्ये किरुथिगा उदयनिधी दिग्दर्शित आणि रवी मोहनसोबतचा 'काधलिक्का नेरामिल्लई', पांडिराज दिग्दर्शित व विजय सेतुपतीसोबतचा 'थलाइवन थलाइवी' आणि धनुषच्या 'इडली कढाई' या चित्रपटांचा समावेश आहे. लवकरच नित्या 'मिस्टर अँड मिसेस ग्रे' (Mr & Mrs Grey) या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.