नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा आणि ताकदवान युक्तिवाद केला आहे. "अपात्रतेची याचिका योग्य वेळी दाखल केली होती. पण विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निर्णय घेतला नाही. त्यांनी योग्यवेळी निर्णय घेतला असता तर पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसता. त्यावेळी योग्य निर्णय झाला असता, तर आज महाराष्ट्राचा इतिहास काहीतरी वेगळा राहिला असता", असा मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
शिंदे गटाच्या वकिलांकडून वारंवार युक्तिवाद केला जात होता की, विधानसभा अध्यक्ष हे स्वतंत्र लवाद आहेत. त्यांचे स्वतंत्र निर्णय आणि स्वतंत्र अधिकार आहेत, त्यामुळे त्यांच्या अधिकारांवर हनन आणलं जाऊ शकत नाही. वेळप्रसंगी हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवता येऊ शकते, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. पण तो युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला.
"विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार कोर्टाला आहे. कोर्टाची स्वतंत्र बॉडी आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे पुनरावलोकन कोर्ट करेल", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. "अपात्रतेचा निर्णय या प्रकरणासाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्या प्रकरणाचा निकाल योग्यवेळी लागला असता तर महाराष्ट्राचा इतिहास काहीतरी वेगळा असता", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
कोर्टात नेमकं काय-काय घडलं?शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. , न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता यांचा युक्तिवाद संपल्यानंतर कपिल सिब्बल यांनी रिजॉईंडर कोर्टात दाखल केला होता. त्यानंतर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती.
गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने कपिल सिब्बल यांना प्रश्न विचारले होते. त्यावरच कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी जवळपास 45 मिनिटे युक्तिवाद केला. आपल्याला आणखी काही मिनिटे युक्तिवाद करायचा असल्याचं सांगत कपिल सिब्बल यांनी उद्याचा देखील वेळ मागितला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल उद्यादेखील थोडावेळ युक्तिवाद करणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोर्टाचा सवाल, सिब्बल यांचे उत्तर"एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये पुकारलेले बंड हे पक्षांतर्गत लोकशाही की पक्षांतराचा मुद्दा आहे? ते पक्षांतर बंदी कायद्यास पात्र आहेत?" असा प्रश्न खंडपीठाने कपिल सिब्बल यांना विचारला होता. त्यावर यांच्याकडून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणाचा दाखला दिला.
युक्तिवादाची सर्वात पहिली सुरुवात ही भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या विषयापासून झाली. एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडून महाविकास आघाडीचा दाखला देण्यात आला होता. पण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची निवडणुकीत युती नव्हती. पण तरिही त्यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दाखला कपिल सिब्बल यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधीमंडळ पक्ष आहे म्हणजे राजकीय पक्ष आहे, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला. यासाठी निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देण्यात आला. पण हे चुकीचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या दाखल्यावरही आक्षेप नोंदवला. विधीमंडळातील बहुमताच्या आधारे अशाप्रकारे पक्ष देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
'विधीमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष ठरवल्यास परिणाम गंभीर'"कोण राजकीय पक्ष आहे हे विधीमंडळ पक्ष ठरवू शकत नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विधीमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष समजलं. पण दहाव्या सूचीनुसार विधीमंडळातील बहुमत राजकीय पक्ष ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष समजल्यास त्याचे परणाम गंभीर होतील", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. विधीमंडळ पक्षातील बहुमत हे राजकीय पक्षात कसं शिफ्ट होऊ शकतं? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी युक्तिवादावेळी उपस्थित केला. निवडून आलेले विधीमंडळ सदस्य हे राजकीय पक्षाच्या अंतर्गत राहतील, असंदेखील कपिल सिब्बल म्हणाले.
'विरोध होता तर पक्षात बैठक बोलावली असती'"शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करणे हे दहाव्या सुचीनुसार अनैतिक आहे. शिंदेंच्या प्रतोदकडून राज्यपालांना पत्र देणे हे सरकारला धक्का देण्याचे पत्र होते. विरोध होता तर पक्षात शिंदेंनी बैठक बोलावली पाहिजे होती. पक्षात मतभेद होते, तर पक्षाच्या बैठकीत मुद्दे मांडायला हवे होते. पक्षाच्या बैठकीत मुद्दा न मांडता सर्वजण सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. शिंदे गट राजकीय पक्षच नाही तर पक्षाच्या लेटर हेडवर पत्रच पाठवू शकत नाही", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
"विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी होते तर दुसरीकडे राहुल नार्वेकर होते. मग त्यासाठी शिंदे गटाच्या लोकांनी मतदान केले ते पक्षहिताचे होते का?", असा सवाल सिब्बल यांनी केला. तसेच " हा या प्रकरणासाठी महत्त्वाचा आहे", असं कपिल सिब्बल म्हणाले.
"सुनील प्रभू यांचा व्हिप पक्षाने अपॉईंट केलेला होता. आमदार अपात्रतेची याचिका योग्यवेळी दाखल केली होती. जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा ते सगळे आमदार होते. अजूनही ती याचिका व्हॅलिड आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय योग्य वेळी घेतला नाही. आमदार अपात्रतेचा निर्णय योग्य वेळेत घेतला असता तर पुढच्या गोष्टी घडल्याच नसत्या", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.