Things Not to Buy After Sunset : ऑफिसमधून घरी जाताना अनेकजणांना बाजारातून वस्तू खरेदी करण्याची सवय असते पण गोधूळ बेला म्हणजेच सूर्यास्तानंतर काही वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जात नाही. या सवयीमुळे घरातील खर्च वाढू शकतो. तसेच, नकारात्मकता वाढण्याची आणि काही ग्रह कमजोर होण्याची शक्यताही वाढते. संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मीचे घरात आगमन आणि दुसरीकडे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होणे दोन्ही गोष्टी एकाचवेळी होत असतात. अशा वेळी या कालावधीत मीठ, दूध यांसह काही वस्तू चुकूनही खरेदी करून घरी आणू नयेत. याचा परिणाम कुटुंबातील शांतता आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत आणि त्या खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेऊया.
सूर्यास्तानंतर या वस्तू खरेदी करून घरी आणू नका1. झाडू - अशी मान्यता आहे की झाडू हे माता लक्ष्मीचे रूप आहे. सूर्यास्तानंतर चुकूनही नवीन झाडू खरेदी करून घरी आणू नये. तसेच, या वेळी जुना झाडूदेखील घराबाहेर काढू नये असे केल्याने घरात आर्थिक चणचण निर्माण होवू शकते.
2. पांढऱ्या रंगाच्या वस्तू - शास्त्रांमध्ये पांढऱ्या वस्तूंचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो. अशा वेळी संध्याकाळी दूध, दही, मीठ यांसारख्या पांढऱ्या वस्तू खरेदी करून घरी आणल्याने कुंडलीतील शुक्र कमजोर होऊ शकतो. त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता असते.
3. टोकदार वस्तू - सूर्यास्तानंतर चुकूनही घरात कात्री, चाकू, सुई किंवा लोखंडाचे कोणतेही साधन खरेदी करून आणू नये. असे सांगतात की, अंधार पडताच लोखंड आणि धारदार वस्तूंमध्ये राहू-शनीची उग्र ऊर्जा सक्रिय होते. अशा वेळी या वस्तू घरात आणल्याने घरात वाद, मतभेद वाढू शकतो.
4. मोहरीचे तेल - सूर्यास्तानंतर कच्चे तेल किंवा मोहरीचे तेल खरेदी केल्याने शनिदोष वाढतो. असे केल्याने घरात आर्थिक समस्या वाढण्याची शक्यता असते. मात्र, संध्याकाळच्या वेळी तेलाचे दान करणे शुभ मानले जाते.
5. काळे कपडे आणि बूट - संध्याकाळी चामड्याचे बूट किंवा गडद काळे कपडे खरेदी करून थेट घरात आणणे उचित मानले जात नाही. अशी मान्यता आहे की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी काळे कपडे किंवा बूट घरी आणणे टाळावे.
संध्याकाळी खरेदीशी संबंधित वास्तु टिप्ससायंकाळी मीठ किंवा दूध खरेदी करावे लागले तर?
काही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळीच मीठ किंवा दूध खरेदी करावे लागले, तर यासाठी सोपा वास्तु उपाय म्हणजे मीठ किंवा दूध थेट स्वयंपाकघरात ठेवू नका. त्याऐवजी, काही वेळासाठी सामान मुख्य दरवाजाबाहेर एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवा. त्यानंतर मनात माता लक्ष्मीचे स्मरण करून दूध किंवा मीठ घरात आणा.
संध्याकाळी हे काम जरूर करा
सूर्यास्ताच्या वेळी घराच्या प्रवेशद्वारावर एक छोटेसे काम जरूर करावे, कारण ही वेळ म्हणजे माता लक्ष्मीचे आगमन असे मानतात. अशा वेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा जरूर लावा. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणे टाळावे.
खरेदी करण्याची योग्य वेळ
नेहमी मोठ्या खरेदी, धातूच्या वस्तू किंवा घराच्या स्वच्छतेसाठी लागणारे सामान दुपार होण्यापूर्वी खरेदी करणे उचित मानले जाते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.