Supriya Sule : पुण्यात आज धक्कादाय घटना घडली आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या (Shivajinagar Court) गेट नंबर 4 बाहेर भरदुपारी गोळीबार आणि कोयता हल्ल्याची घटना झाली आहे. मंदार किवळे (Mandar Kiwale) असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते कात्रज भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुणे हे शिक्षणाचे माह्रघर आहे. अतिशय सुरक्षित शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. मी माननीय मुख्यमंत्री यांना वारंवार सांगत आले आहे की मला जेंव्हा होम कमेटीनध्ये काम करण्याची संधी दिली होती, तेव्हापासून क्राईममध्ये महाराष्ट्र क्रमांक एक आणि देशात चौथ्या क्रमांकावर पुणे येतो असे सुळे म्हणाल्या. हा विषय अंत्यत महत्वाचा आहे. हे देशाच्या हिताचे नाही हे राज्याच्या हिताचे नाही. आज जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे असे सुळे म्हणाल्या.
एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी पुण्याचे पालकत्व घेऊन हे थांबवावे असे सुळे म्हणाल्या. मला पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण पुण्यात आल्यावर त्यांना काय होतं हे माहिती नाही असेही सुळे म्हणाल्या.
बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळ हा थरार घडला. कात्रज भागातील रहिवासी असलेला मंदार किवळे (Mandar Kiwale) हा कोर्टातील सुनावणी आटोपून गेट नंबर 4 बाहेर आला असता, दोन दुचाकीवरून आलेल्या 6 हल्लेखोरांनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप जीवघेणे वार केले. भर गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण हल्ल्याचा कट रचणाऱ्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली असून, थेट हल्ल्यात सहभागी असलेल्या आणखी 3 आरोपींना पुणे गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) दौंडमधून बेड्या ठोकल्या आहेत. ज्यांनी या रक्तरंजित हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होता, त्या अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण यांना पुणे क्राईम ब्रँचने (Crime Branch) पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 प्रत्यक्ष हल्लेखोरांना पुणे क्राईम ब्रँचने दौंड परिसरात सापळा रचून अटक केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.