एका हॉटेलच्या खोलीत 19 वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळली आहे. ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. ती सोमवारी सकाळी कॉलेजला जाण्याचे सांगून घरून निघाली होती. दुपारी तिचा मोबाइल बंद झाला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पोलिसांना ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. काही तासानंतर ती हॉटेलच्या एका खोलीत मृत अवस्थेत सापडली. हॉटेलच्या रूमध्ये उंदीर मारण्याच विष आणि एक हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत 'माझे जे काही आहे ते सगळे माझ्या पश्चात अंकितच्या मालकीचे असेल' असे लिहिले आहे. या चिठ्ठीमुळे पोलिसांना संशय आला आहे.

नेमकं काय घडलं?

19 वर्षीय तरुणी ही बी कोमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ही विद्यार्थिनी फरीदाबादमधील 'हॉटेल जोया' मध्ये बेडवर बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. ही विद्यार्थिनी सोमवारी सकाळी कॉलेजला जाण्याचे सांगून घरून निघडली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत तिचे कुटुंबीय तिच्याशी फोनवर संपर्कात होते. मात्र त्यानंतर तिचा मोबाइल बंद झाला. कुटुंबीयांनी तिला वारंवार फोन केले मात्र काही उत्तर मिळाला नाही. ती घरी देखील परत आली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी सकाळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा ती एका हॉटेलच्या खोलीत बेडवर मृतावस्थेत सापडली.

तरुणी आणि तिचा शेजारी हॉटेलमध्ये आले होतेपोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तरुणी आणि तिच्या शेजारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे जमा केली होती. तो व्यक्ति रात्री निघून गेला, तर ती तरुणी खोलीतच राहिली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावून तिला चेक-आउट साठी विचारले, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.


सापडलेल्या चिठ्ठीची हस्ताक्षर जुळत नाहीपोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना हस्तलिखित चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत 'माझे जे काही आहे ते सगळे माझ्या पश्चात अंकितच्या मालकीचे असेल'लिहिले आहे. मात्र या चिठ्ठीत असलेली हस्ताक्षर तरुणीच्या हस्ताक्षराशी जुळत नाही आहे. पोलिसांना संशय आहे की तपासची दिशा भरकटवण्यासाठी त्या शेजऱ्यानेच ही चिठ्ठी लिहिली असावी. पोलिस याचा तपास करत आहे.

शेजारी फरारतरुणीसोबत हॉटेलमध्ये जाणाऱ्या शेजारी हा फरार आहे. त्याचे शोध घेतला जात आहे. पोलिसानी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शेजऱ्याचे कुटुंब ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.त्याच्याकडे चार ते पाचू ट्रक आहेत. तेचे आई वडील आता हयात नाहीत. तो अनेकदा त्या तरुणीच्या घरी जात होता आणि त्यांच्या घरी कधी-कधी मुक्काम देखील करत होता.

पोलीस तपास सुरूपोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बुधवारी शवविच्छेदन करण्यात येईल. मृत्यू मागचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिस फरार शेजऱ्याचे तपास करत आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.