पुणे : पुण्यात अपघाताची सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ हा अंगावर काटा आणणारा आहे. एक आयसर ट्रक प्रचंड वेगात होता. बोपदेव घाटाच्या उतारावरुन जात असताना आयसर ट्रक प्रचंड वेगात होता. या परिसरात एक महाविद्यालय आहे. संध्याकाळची वेळ असल्याने महाविद्यालय सुटले होते. सर्व विद्यार्थी हे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. यासाठी अनेक विद्यार्थी हे परिसरातील रस्त्याच्याकडेला असणाऱ्या बस स्टँड इथे उभे होते. विद्यार्थ्यांचा मोठा घोळका हा बस स्टँडवर होता. तसेच रस्त्याच्या बाजूनेदेखील विद्यार्थी पायी जात होते. आपल्यावर इतकं भीषण आणि भयानक संकट कोसळले, अशी या विद्यार्थ्यांना कल्पनादेखील नसेल. पण अचानक आलेल्या भरधाव ट्रकने काही मुलांना चिरडलं. यामुळे मोठा हाहा:कार उडाला. प्रचंड धावपळ झाली.

संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे आवाजासह कैद झाली आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचा दावा केला जातोय. रस्त्यावर फार वाहनं होते, असाही विषय नाही. रस्त्याने थोड्याफार प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु होती. पण अचानक भरधाव ट्रक बोपदेव घाटाच्या उतारावर भरधाव वेगाने आला. पुढे कार आणि रिक्षा असल्याने ट्रकचालकाने रस्त्याच्या कडेला गाडी घेतली.

दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यूगाडी वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्याकडेला काही विद्यार्थी पायी चालत जात होते. या ट्रकने त्या विद्यार्थ्यांना चिरडलं आणि त्यानंतर ट्रक पुन्हा त्याच वेगाने पुढे गेला. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. उतारावर ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात मोठी घबराट परसरली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर भारती हॉस्पिटलमध्ये तिघांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित ट्रक हा डीजेचा असण्याची शक्यता आहे. या ट्रकला आता घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर अचानक दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण सैरभैर झाले आहेत. आता या प्रकरणात काय-काय कारवाई केली जाते आणि मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना काही प्रशासकीय मदत केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना कदाचित आर्थिक मदत देखील केली जाऊ शकते. पण या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांची जी हानी झाली आहे ती कधीही भरुन काढता येणार नाही. अशा घटना घडूच नयेत यासाठी काहीतरी उपाययोजनांची नितांत आवशक्यता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.