दोहा : आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत इंडिया ए टीमने मंगळवारी २४ नोव्हेंबरला यूएईच्या मुख्य संघावर विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने २५० धावांचं आव्हान हे अवघ्या १५ व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. वैभवने केलेल्या २०४ धावांच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. भारताचा हा साखळी फेरीतील दुसरा विजय ठरला. भारताने यासह उपांत्य फेरीतील प्रवेश केला. यासह सेमी फायनलसाठी ४ संघ नक्की झाले. आता उपांत्य फेरीत कोणते ४ संघ कुणाविरुद्ध खेळणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान, पाकिस्तान ए , श्रीलंका ए आणि बांगलादेश ए या ४ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना गुरुवारी २६ नोव्हेंबरला होणार आहे. भारतासमोर या सामन्यात ए ग्रुपमध्ये साखळी फेरीत अजिंक्य असलेल्या श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे दोहामधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्यासाठी भारतीय संघासमोर अजिंक्य असलेल्या श्रीलंकेचा विजयरथ रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे याच्या नेतृत्वात भारताची युवा टीम कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान-बांगलादेश आमनेसामनेसेमी फायनलमधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. पाकिस्तान श्रीलंकेप्रमाणे साखळी फेरीत अजिंक्य राहिली आहे. पाकिस्तानने भारतालाही साखळी फेरीत पराभूत केलंय. त्यामुळे साखळी फेरीत सलग ३ सामने जिंकणारी पाकिस्तान बांगलादेशला पराभूत करुन फायनलमध्ये धडक देणार का? यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा सामना शुक्रवारी २७ नोव्हेंबरला दोहामध्येच होणार आहे.

फायनलसाठी ४ संघांत लढत

With just two rounds remaining, the race for the #DPWorldMensAsiaCupRisingStars2026 title is heating up! Who will rise above the rest and take home the crown? 👑#ACC https://t.co/WrJbKwQcHW

— Asian Cricket Council (@ACCMedia1) ]]>

सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या ४ संघांची साखळी फेरीतील कामगिरीश्रीलंका आणि बांगलादेश या २ संघांनी ए ग्रुपमधून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. श्रीलंकेने साखळी फेरीत अफगाणिस्तान, हाँगकाँग चीन आणि बांगलादेशवर विजय मिळवला. श्रीलंकेने साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं. तर बांगलादेशने ३ पैकी २ सामने जिंकले. बांगलादेशने सलग २ सामने जिंकले. बांगलादेशने हाँगकाँग चीन आणि अफगाणिस्तानवर मात केली. मात्र बांगलादेशला साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करुन विजयी हॅट्रिक करण्यात अपयश आलं. अफगाणिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत एकमेव सामना जिंकला. तर हाँगकाँगला विजयाची चवही चाखता आली नाही.

बी ग्रुपमधील संघांची कामगिरीपाकिस्तानने साखळी फेरीत आपला विजयरथ कायम राखला. पाकिस्तानने यूएई, टीम इंडिया आणि नेपाळवर विजय मिळवला. पाकिस्तानने तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले. त्यामुळे पाकिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राहिली. तिलक वर्मा याच्या नेतृत्वात भारताने ३ पैकी २ सामन्यांत विजय मिळवला. भारताने नेपाळ आणि यूएईवर मात केली. नेपाळने एकमेव सामना जिंकला. नेपाळने यूएईला पराभूत केलं. तर यूएईने तिन्ही सामने गमावले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.