Tariff on India : अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा झटका बसला. अन्य देशांसोबतचे ट्रम्प यांचे धोरण तसेच इतर काही निर्णयांमुळे मतदारांनी ट्रम्प यांच्या पक्षाला नाकारलं. हा धक्का बसल्यानंतर ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणात बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु यात कोणताही बदल होताना दिसत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी लादलेल्या टॅरिफमुळे भारत तसेच इतर अनेक देशांचे प्रचंड नुकसान झाले. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपले टॅरिफचे शस्त्र उचलले आहे. त्यांनी भारतासह अन्य 14 देशांवर टॅरिफ म्हणजेच आयातशुल्क लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या निर्णयाचा फटका भारत तसेच चीनला बसण्याची शक्यता आहे.




अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 14 प्रमुख व्यापारी भागीदार देशांवर नव्याने आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या व्यापाराला फटका बसत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्याच्या धोरणामुळे अमेरिकेतील स्थानिक उद्योगांचे नुकसान होत असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) आठ महिने तपास केल्यानंतर हा प्रस्ताव तयार केला आहे.




कोणत्या देशांवर टॅरिफ लावणार?


या प्रस्तावित यादीत भारतासह चीन, बांगलादेश, कंबोडिया, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. मेक्सिको आणि नॉर्वेला सध्या या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे.




चीनवर सर्वात मोठा फटका बसणार


प्रस्तावानुसार, संबंधित देशांमधून होणाऱ्या आयातीवर 20 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. चीनवर याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू करण्यात आलेले सुमारे 25 टक्के आयात शुल्क अजूनही कायम आहे. जुलै महिन्यात लादण्यात आलेल्याक 19 ते 12.5 टक्के शुल्कावर हे नवे आयात शुल्क आकारले जाणार नाही.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.