Gondia Accident News: गोंदियाच्या गंगाझरी पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनाने धडक दिल्याने तीन युवकांचा मृत्यू (Gondia Accident News) झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता वाहन चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 3 युवकांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव होता, या प्रकरणात पोलीस वाहन चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंगाझरी पोलीस स्थानकात निष्काळजीपणे वाहन चालवून तीन लोकांच्या मरणास कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. (Gondia Gangazhari Accident News)


Gondia Accident News: पोलीस वाहनाच्या धडकेमध्ये तीन तरुणांचा मृत्यू, गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक


गोंदियाच्या गंगाझरी पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनाच्या धडकेमध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना दांडेगाव या ठिकाणी घडली होती. या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृतदेह शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलिसांच्या वतीने या प्रकरणाचे निष्पक्षपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आणि वाहन चालविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर मृतकाच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारले असून पोलिसांच्या बंदोबस्तात तिन्ही तरुणांवर त्यांच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


Gondia Police: पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचं आश्वासन; पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई


दरम्यान, या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्याच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून योग्य तपास केला जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिले होते. अखेर पोलीस वाहन चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणे वाहन चालून तिघांच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. तर गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी ही कारवाई केली असून टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिल्याने 3 युवकांचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.