Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: पुण्यात शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात झालेल्या मंदार किवळे (Mandar Kiwale Case) याच्यावरील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रथमेश येनपुरे ऊर्फ येनप्याला काल पोलिसांनी अटक केली. काल रात्री पोलिसांना गुंगारा देऊन शेतात पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. मंदार किवळे हल्ला प्रकरणातील एकूण 9 आरोपींपैकी आठ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (Pune Mandar Kiwale)
पुण्यातील गोळीबार प्रकरणात एकूण 16 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत, क्राईम ब्रँचकडून 8 जण अटकेत आहे. आज दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. न्यायालयासमोरच चक्क 6 जणांच्या टोळक्याने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. गोळीचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदार किवळेचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात मंदारचे दोन्ही हात तुटले होते. सध्या गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case)
आरोपीला तत्परतेने पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे अजून रिकव्हर करायची आहेत. हल्ल्याच मुख्य कारण हे जमिनीचा वाद आहे याबाबत देखील तपास केला जाणार आहे. न्यायालयाने आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुन्यावण्यात आली आहे. 2 डिसेंबरला पुन्हा त्यांना कोर्टात आणण्यात येणार आहे. जखमी हा गंभीर आहे. त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यात आणखी काही जण आहेत का यादिशेने तपास केला जाईल, अशी माहिती मंदार किवळेचे वकिल शुभांगी परुळेकर यांनी दिली.
सदर वाद पुण्यातील कात्रजमधल्या अर्धा गुंठा जागेचा आहे. कात्रजच्या संतोषनगरमधील दोन गुंठ्यांचा तो भूखंड आहे. त्यापैकी अर्धा गुंठा जागेच्या मालकीवरून गँगवॉर सुरू झालं. एका बाजूला शुभम चव्हाण आणि त्याचे साथीदार... दुसऱ्या बाजुला मंदार किवळे आणि त्याची गँग...याच जागेच्या वादातून 20 एप्रिल 2025 ला शुभम चव्हाणची हत्या झाली होती. शुभम चव्हाणच्या हत्या प्रकरणात अमर साकोरे, मंदार किवळे, गिरीष वावरे आणि योगेश डोरे या चौघांना अटक झाली होती.
2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात शुभम चव्हाण (Shubham Chavan Case) या तरुणाचा खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता. तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. शुभम चव्हाण याचा भाऊ आणि मित्र यांनी शपथ घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार, असा निर्धार भावाने केला होता आणि या प्रकरणातील आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर सपासप वार करण्यात आले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.