विजय यांच्या नेतृत्त्वातील सरकारची घोषणा


वृत्तसंस्था/चेन्नई


तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 15 दिवसांची ‘पितृत्व रजा’ देण्याच घोषणा गुरुवारी केली. मुलांच्या संगोपनात पुरुषांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे विवाहित पुरुष कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पितृत्व रजा घेता येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.  सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार बाळाच्या जन्माच्या 15 दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत ही 15 दिवसांची रजा घेता येणार आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच 365 दिवसांची मातृत्व रजा दिली जाते. पालकत्वाची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता यावी, यासाठी पुरुषांना अशा प्रकारची रजा देण्याचा निर्णय घेणारे तामिळनाडू हे पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन रजा सुविधा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा मिळावी, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.