कमी खर्चात टेलिकॉम सुविधा आणि विमा संरक्षण हवे असलेल्या ग्राहकांसाठी BSNL चा 202 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपयुक्त ठरत आहे. रिचार्ज केल्यानंतर 24 तासांनी सक्रिय होणाऱ्या या विम्यांतर्गत रस्ते अपघात किंवा सर्पदंशासारख्या पाच विशिष्ट घटनांमध्ये 1 लाख रुपयांचे कवच आणि बँक खाते लिंक असल्यास सायबर फ्रॉड कव्हर मिळते.
मोबाइल रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ व्हॉइस कॉलिंग, इंटरनेट डेटा SMS हेच फायदे मिळतात. मात्र, BSNL ने आपल्या 202 रुपयांच्या (STV 202) स्पेशल रिचार्ज प्लॅनमध्ये टेलिकॉम सुविधांसोबतच विमा संरक्षण देण्याची सुविधा सुरू केली आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती विमा आणि 10,000 संरक्षण मोफत दिले जात आहे.
कॉलिंग, डेटा, वैधतेचे तपशीलBSNL ने 1 ऑक्टोबर 2026 रोजी ही विमा योजना सुरू केली तेव्हा या प्लॅनची वैधता 30 दिवस होती, मात्र नोव्हेंबर 2026 मध्ये कंपनीने ती बदलून 28 दिवस केली आहे. या संपूर्ण 28 दिवसांच्या कालावधीसाठी ग्राहकांना लोकल आणि STD नेटवर्कवर बोलण्यासाठी एकूण 300 मिनिटे मोफत व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, इंटरनेट वापरासाठी दैनंदिन मर्यादेऐवजी एकत्रित 5GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. हा 5GB डेटा संपल्यानंतरही इंटरनेट पूर्णपणे बंद होत नाही, तर त्याचा वेग 40Kbps इतका मर्यादित होतो. याशिवाय, संपूर्ण वैधतेसाठी एकूण 100 मोफत एसएमएसचा लाभही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. हीच विमा सुविधा BSNL च्या 2,449 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवरही उपलब्ध आहे.
1 लाख रुपयांचा विमाया प्लॅनमध्ये दुहेरी विमा संरक्षण देण्यासाठी BSNL ने सरकारी क्षेत्रातील 'द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी' सोबत भागीदारी केली आहे. नियमानुसार,1 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा केवळ 5 विशिष्ट घटनांमध्येच लागू होतो: (1) रस्ते अपघात, (2) भाजणे, (3) सर्पदंश, (4) वीज कोसळणे आणि (5) विजेचा धक्का लागणे.
यासोबतच, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी यामध्ये 10,000 कव्हर देखील समाविष्ट आहे. रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर 24 तासांनी हा विमा आपोआप सक्रिय होतो आणि ग्राहकांना त्याचा एसएमएस प्राप्त होतो.
क्लेम करण्यासाठी महत्त्वाची वेळ मर्यादाविम्याचा दावा करण्यासाठी विमा कंपनीने कडक वेळ मर्यादा निश्चित केली आहे. दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांनी 48 तासांच्या आत, तर सायबर फ्रॉड झाल्यास 7 दिवसांच्या आत विमा कंपनीला कळवणे अनिवार्य आहे. यासाठी ग्राहक 1800 11 8485 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा
Claims.bsnl@orientalinsurance.co.in या ईमेलवर संपर्क साधून दावा दाखल करू शकतात. तसेच, सायबर फ्रॉड कव्हरचा लाभ घेण्यासाठी संबंधित BSNL नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.