Mumbai Crime News: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर (Ghatkopar Railway Station) अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. यात 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत बलात्कार (Mumbai Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं रेल्वे स्थानकावरील प्रवाशी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या घटनेनं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. खडवली येथील 60 वर्षीय महिला आपल्या 18 वर्षीय मुलीसोबत कसारा लोकलची वाट पाहत असताना हा धक्कादायक प्रकार (Crime News) घडला असल्याची माहिती आहे. तर ⁠पीडित महिला प्लॅटफार्मवरील एका कोपऱ्यात असलेल्या सुलभ शौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेली असताना ⁠आरोपीने तिच्या न कळत तिचा पाठलाग केला आणि संधी मिळताच सुलभ शौचालयात जाऊन तिच्यावर जबरदस्ती केली. यात महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत बलात्कार (Mumbai Crime News) केल्याचे समोर आलं असून आता रेल्वे स्थानकांवरही महिला सुरक्षित नाही का? आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाहीये का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही ⁠घटना गुरुवारी रात्री 11 ची असल्याने प्लॅटफाॅर्मवर त्यावेळी कोणीच नव्हते. परिणामी महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली. ⁠या मारहाणीत महिलेच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे. ⁠महिलेला मारहाण केल्यानंतर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करत शौचालयातून पळ काढला. दरम्यान, ⁠स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत महिलेने मुलीला आणि जीआरपी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्ष्यात घेत पोलिसांनी तात्काळ ⁠सीसीटिव्ही तपासले असता आरोपी मेट्रो स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आलं.


Mumbai Crime: आरोपीच्या शोधासाठी सात पथके तैनात अन् अटक; नशा करून हे गैरकृत्य केल्याचा पोलिसांना संशय


दरम्यान, ⁠आरोपीच्या शोधासाठी कुर्ला जीआरपीकडून सात पथके तैनात करण्यात आली होती. ⁠पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता आरोपी, घाटकोपर असल्फा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तस्लीम नूर मोहम्मद शाह (वय २७) याला अटक केली आहे. ⁠व्यवसायाने टेलर असलेल्या तस्लीमने अंमली पदार्थाची नशा करून हे गैरकृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. ⁠या घटनेतील गंभीर दखल रेल्वे पोलिसांनी घेतली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलिस करत आहे. मात्र या घटनेनंतर मुंबईची लोकल ही महिलांसाठी असुरक्षित असल्याचे निदर्शनास येते.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.