>>मंगेश मोरे<<
रोड रोलर चालकाची लेक ते केबीसीची लखपती हा 36 वर्षीय वृषाली मेढे (मगरे) यांचा प्रवास प्रत्येक कष्टकरी कुटुंबासाठी आणि महिलांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे. वाहकाच्या खाकी गणवेशातील या रणरागिणीने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर एसटी महामंडळाचे नाव देशभरात उज्ज्वल केले. स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीला आत्मविश्वास आणि चिकाटीची जोड हवी हेच जळगावमधील `लालपरी`च्या संघर्षातून अधोरेखित झाले आहे.
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही. भुसावळ आगारात वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली अतुल मेढे (मगरे) यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. दहा महिन्यांच्या चिमुकलीला सांभाळत `लालपरी’ची अखंड सेवा करत त्यांनी `कौन बनेगा करोडपता’च्या (केबीसी) हॉटसीटपर्यंत मजल मारली. या मंचावर त्यांनी 12 लाख 50 हजार रुपये जिंकून एसटी महामंडळाची मान अभिमानाने उंचावली आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत, ग्रामीण भागातील अडीअडचणी-संघर्षाला सामोरे जात वृषाली यांनी `केबीसी’चा मंच गाठल्याने त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
चाळीसगाव येथील सामान्य कुटुंबात वृषाली यांचा जन्म झाला. दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. वडील गावागावातील डांबरी रस्त्यांच्या बांधकामात `रोड रोलर’ चालवण्याचे कष्टाचे काम करायचे. गरीब परिस्थितीमुळे कुटुंबातील मुलींचे शिक्षण फारसे झाले नव्हते. वृषाली यांची मोठी बहीण कमी शिकलेली, तर आई पूर्णपणे अशिक्षित. मात्र, शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आईने धाकटय़ा लेकीला अर्थात वृषाली यांना शिकण्यासाठी नेहमीच बळ दिले. गरिबीची झळ शिक्षणाला बसू न देता वृषाली यांनी जिद्दीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आईच्या इच्छेनुसार स्वतच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. नोकरीच्या शोधात असताना एका `कॅम्पस इंटरह्यू’मध्ये त्यांना एसटी महामंडळातील वाहक पदासाठी `बॅज’ आवश्यक असल्याचे समजले. त्यांनी मैत्रिणीसोबत तत्काळ जळगाव आरटीओ कार्यालय गाठून
बॅज मिळवला. त्यानंतर धुळे जिह्यातील भरती प्रािढयेत पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आणि 2011 मध्ये नंदुरबार येथे त्या एसटी सेवेत रुजू झाल्या.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना चाळीसगाव ते नंदुरबारदरम्यान रोजचा 150 किलोमीटर जाण्याचा आणि 150 किलोमीटर येण्याचा असा 300 किलोमीटरचा दगदगीचा प्रवास करावा लागायचा. दिवस-रात्र बसमध्येच डय़ुटी असायची. डय़ुटी संपवून रात्री 12 वाजताची नंदुरबार-संभाजीनगर बस पकडून त्या चाळीसगावला घरी परत यायच्या. दिवसभराच्या कामाने इतक्या थकलेल्या असायच्या की बसमध्येच झोप लागायची. आपली लेक झोपेच्या भरात स्वतचा थांबा सोडून पुढे तर जात नाही ना, या काळजीपोटी वडील दररोज मध्यरात्री बसस्थानकावर उभे राहायचे आणि येणाऱ्या प्रत्येक बसच्या खिडकीतून डोकावून पाहायचे. यशाच्या सुरुवातीच्या खडतर प्रवासातील बापमाणसाची ही सोबत लाखमोलाची असते, असे वृषाली भावुकपणे सांगतात. नोकरीतील दीड वर्षाचा हा खडतर प्रवास केल्यानंतर नंदुरबार आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या कष्टाची दखल घेतली आणि चाळीसगाव येथे त्यांच्या घराशेजारीच रात्री मुक्कामी (वस्तीला) राहणाऱ्या बसफेरीवर त्यांची डय़ुटी लावली. पहाटे 5:30 वाजता गावातूनच बस घेऊन डय़ुटी सुरू करायची आणि दिवसभर फेरी मारून बस पुन्हा गावी आणायची. हा डय़ुटीचा दिपाम त्यांनी सलग चार वर्षे निष्ठेने सांभाळला. आज त्या भुसावळ आगारात कार्यरत असून आपल्या 10 महिन्यांच्या मुलीला सांभाळत `लालपरी’ची सेवा करत आहेत.
वृषाली यांना लहानपणापासूनच प्रश्नमंजुषेची आवड होती. यापूर्वी त्यांनी दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या हाती सूत्रसंचालनाची धुरा असलेल्या `आज आत्ता ताबडतोब’ या कार्पामात आणि 2022 मध्ये कलर्स वाहिनीवरील रणबीर सिंग सूत्रसंचालन करत असलेल्या `द बिग पिक्चर` शोमध्ये सहभाग घेतला होता. हाच उत्साह त्यांना केबीसी मंचापर्यंत घेऊन गेला. अनेक कठीण चाचण्या आणि मुलाखतींचा पल्ला ओलांडत त्यांची मुंबईतील केबीसीच्या सेटवर निवड झाली. तिथे देशभरातून स्पर्धक आले होते. सुरुवातीचे दोन दिवस `फास्टेस्ट फिंगर फर्स्ट`मध्ये त्यांचा नंबर लागला नाही. अखेरीस शेवटच्या फेरीत अत्यंत रोमांचक प्रसंग घडला. एका स्पर्धकाने 0.43 सेकंदात बझर दाबला, तर वृषाली यांनी 0.46 सेकंदात उत्तर दिले होते. मात्र, पहिल्या स्पर्धकाचे उत्तर चुकले आणि वृषाली यांना संधी मिळाली.
`पय्योली एक्सप्रेस म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखले जाते?` या प्रश्नावर वृषाली यांनी क्षणाचाही विलंब न करता `पी. टी. उषा` हे अचूक उत्तर दिले. अमिताभ बच्चन यांनी `आपने सही जवाब दिया है’ म्हणत स्वत त्यांचा हात धरून त्यांना हॉटसीटवर नेऊन बसवले. हॉटसीटवर पोहोचताच वृषाली यांचा आनंद अश्रूंच्या रूपाने बाहेर आला. अमिताभ बच्चन यांनी स्वत त्यांचे अश्रू पुसले. आपल्या 10 महिन्यांच्या बाळाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष ऐकून अमिताभजीही भावूक झाले. वृषाली यांनी अत्यंत हुशारीने खेळत 25 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. त्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्याने त्यांनी खेळ थांबवण्याचा समंजस निर्णय घेतला आणि 12 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. रोड रोलर चालकाची लेक ते केबीसीची लखपती हा 36 वर्षीय वृषाली मेढे (मगरे) यांचा प्रवास प्रत्येक कष्टकरी कुटुंबासाठी आणि महिलांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे. वाहकाच्या खाकी गणवेशातील या रणरागिणीने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर एसटी महामंडळाचे नाव देशभरात उज्ज्वल केले. स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीला आत्मविश्वास आणि चिकाटीची जोड हवी हेच जळगावमधील `लालपरी`च्या संघर्षातून अधोरेखित झाले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.